जय मल्हार - धनगर समाज विवाह

बंधू आणि भगिनींनो 💐🌷🥀🌹🌾

ज्या पालकांना आपल्या लाडक्या मुला मुलींची मेळाव्यासाठी नोंदणी करायची आहे त्यांनी पूर्ण बायोडाटा सदर वेबसाईटवर नोंदणी करावा..

अविवाहीत, घटस्फोटीत, विधवा..

ज्यांना नोंदणी करता येत नसेल त्यांनी बायोडाटा व्हाट्सअप्प वर पाठवावा..

9011844225

धनगर समाज विवाह विषयी थोडस...

लग्न म्हणजे भारतीय संस्कृतीतील सर्वात पवित्र संस्कार. विवाह म्हणजे आपण सर्वांच्याच आयुष्यातील एक चिरस्मरणीय, व्यक्तिगत अन सामाजिक सोहळा. लग्न म्हणजे दोन जीवांच्या एकरूप संसाराची मुहूर्तमेढ. पण या एकविसाव्या शतकात प्रत्येक पुरुषाच्या आणि स्त्रीच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत असे दिसते. त्या मुळे लग्न जमविताना फार विचार करावा लागतो.

त्यात मुलगा किंवा मुलगी सुशिक्षित असल्यामुळे पालकही जागरूक होत आहेत. सर्वार्थाने सुखी संसार करायचा तर जोडीदाराची उत्तम साथ हवी, म्हणूनच सुयोग्य जोडीदार निवडण्याच्या प्रक्रियेत पालक आणि मुले दोघांचा समावेश आवश्यक आहे. पालकांचा अनुभव आणि मुलांच्या अपेक्षा याचा सुरेख ताळमेळ व्हावा आणि काळजी पूर्वक व सोप्या बहुविध पर्यायातून जोडीदार निवडता यावा ह्याच सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून आणि इच्छेतून हा समाज प्रश्न सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

धनगर समाज विवाह चा उद्देश...

सन्माननीय समाज बांधव जय मल्हार,...

आजकाल विवाह जुळवणे ही समस्या होत चालली आहे. या करिता समाजाच्या विविध सामाजिक संघटना वधु-वर मेळावे आयोजीत करून हि समस्या सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत. २१ व्या शतकात शिक्षणाची संधी वाढल्याने युवक-युवतींचे शिक्षणाचे प्रमाण वाढले असून सगळ्यांच्या अपेक्षाही वाढल्या असल्याने मनपसंत जावाई अथवा सून मिळविण्यासाठी व तसेच मुला-मुलींच्याही आपल्या जोडीदारा बाबत काही प्रश्न अथवा अपेक्षा असतात ती पूर्ण करण्यासाठी कधी वधु-वर अथवा त्यांचे पालक, नातेवाईकांची वधु-वर मेळाव्यांसाठी गर्दी होतांना दिसत आहे.

www.dhangarsamaj.com हि वेबसाईट एक सामाजिक उपक्रम म्हणून उपवर वधु-वरांची माहिती या वेबसाईट वर प्रकाशित करून हा सामाजिक प्रश्न सोडविण्याचा धनगर समाज विवाह चा प्रयत्न आहे.

आमचे उद्दिष्ट

वधु-वर मेळाव्याचे निमंत्रणे व माहिती सर्व समाज बांधवापर्यंत पोहचू शकत नाहीत. अनेक समाज बांधव अथवा वधु-वर काही वैयक्तिक अडचणीमुळे वधु-वर मेळाव्यास उपस्थिती राहु शकत नाही. त्यामुळे अनेक चांगली स्थळे संपर्कात येत नाही. वधुपित्याला किंवा वरपित्याला योग्य स्थळ शोधण्यासाठी फार मोठे कष्ट घ्यावे लागतात. भ्रमंती करावी लागते या मध्ये वेळेचा व पैशाचा फार मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो.

हा त्रास, वेळ व पैशाचा खर्च कमी करण्यासाठी सर्व वधु-वरांची माहिती एकाच ठिकाणी फार मोठ्या स्वरुपात www.dhangarsamaj.com या वेब साईटवर उपलब्ध करण्याचा उद्देश आहे.

www.dhangarsamaj.com या वेबसाईटच्या माध्यमातून होणाऱ्या वधु-वरांची नाव नोंदणी केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर रोजगारा निमित्त महाराष्ट्राबाहेर गेलेल्या समाजबांधावाला देखील वधु-वर संशोधनासाठी उपयोगी ठरून अनेक विवाहइच्छुकांचे ऋणानुबंध जुळले जातील व एक स्वास्थ व आनंदी धनगर समाजाची निर्मिती होईल यात शंका नाही.

महत्वाची टीप

आम्ही फक्त वधु-वर सुचक आहोत. मध्यस्ती, पसंती व व्यवहार यात 'धनगर समाज विवाह' चा कोणताही संबंध नसेल. तसेच स्थळाची वागणुक, नितीमत्ता, सत्यता, चारित्र्य इत्यादी व बायोडाटात लिहिलेली सर्व माहितीची खातरजमा स्वतः स्थळ निश्चित करण्या आधी करून घ्यावी. ती सर्व जबाबदारी सर्वस्वी सभासदाची अथवा पालकांची आहे.

सदर वेबसाईट पूर्ण पणे मोफत आहे..

9011844225

जय मल्हार

धन्यवाद...

सदर मोबाइल आपल्या ग्रुप मध्ये ऍड करावा तसेच कृपया हा msg आपल्या सर्व व्हाट्सअप्प ग्रुप व फेसबुकवर पाठवावा

ही नम्र विनंती 🙏🙏🙏🙏💐💐💐

आम्ही का निवडा

सत्यापित प्रोफाइल

सर्व प्रोफाइल सत्यता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सत्यापित आहेत

गोपनीयता सुरक्षित

आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित आणि गोपनीय आहे

प्रगत शोध

शिक्षण, स्थान आणि पसंतीनुसार जुळणी शोधा

सोपे वापर

सर्व वयोगटांसाठी सोपे आणि वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस

मोफत नोंदणी

आपले प्रोफाइल पूर्णपणे मोफत नोंदणी करा आणि तयार करा

24/7 सहाय्य

आमची टीम आपल्या मदतीसाठी नेहमी तयार आहे

हे कसे काम करते

1

नोंदणी करा

मूलभूत तपशील आणि पसंतीसह आपले प्रोफाइल तयार करा

2

शोधा

आपल्या मापदंडाशी जुळणारी सत्यापित प्रोफाइल पहा

3

संपर्क साधा

आपल्याला आवडणार्या प्रोफाइलशी संपर्क साधा आणि संभाषण सुरू करा

4

प्रेम शोधा

आपल्या परिपूर्ण जुळणीला भेटा आणि आपला प्रवास एकत्र सुरू करा

Ready to Find Your Life Partner?

Join thousands of happy couples who found their match through us

Register Now - It's Free!

Recent Registrations

Meet our newest members

Akshay

Akshay

27 years

Pune

B.Com, MBA

View Profile
Swapnil vitthal shedge

Swapnil vitthal shedge

30 years

Raigad

12 pass

View Profile
Komal

Komal

26 years

Aurangabad

M Pharm (Pharmaceutics) PhD (1st year)

View Profile
Raghunath

Raghunath

45 years

Sangli

B.A. under grajut

View Profile
 babasaheb

babasaheb

44 years

Nashik

12th

View Profile
Sagar

Sagar

37 years

B.com

View Profile